महिलांनी हाती घेतली प्रचाराची धुरा

चिऊताईचे नाव गावागावात; मतदारांपर्यंत पोहोचतोय शिट्टीचा आवाज

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग मुरूड रोहा विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्या प्रचाराचा वेग वाढू लागला आहे. ग्रामीण भागात वाड्या वस्त्यांमधील महिला घरोघरी जाऊन चिऊताईंचा प्रचार करीत आहेत. त्यामुळे चिऊताईंचे नाव गावागावात मतदारांपर्यंत पोहचत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

अलिबाग, मुरूड रोहा या तिन्ही तालुक्यांमध्ये प्रचाराचा धडाकाने जोराने सुरु आहे. चित्रलेखा पाटील गाव बैठकींच्या माध्यमातून मतदारांसोबत संवाद साधत आहेत. निवडणूकीचा प्रचार अंतिम टप्प्यात येऊ लागला आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातील महिला प्रचाराचे काम जोमाने काम करीत आहेत. रात्रीचा दिवस करून मतदारापर्यंत पोहचून निशाणी शिट्टी घराघरात पोहचवत आहेत. बेलोशी, मल्याण, महान, महानवाडी, खैरवाडी, जांभूळवाडी, आंदोशी, रामराज, रेवदंडा, खानाव अशा अनेक गावांमध्ये स्वतः महिला एकत्र येऊन चित्रलेखा पाटील यांचा प्रचार करीत असल्याचे चित्र आहे. घराघरात जाऊन चित्रलेखा पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे.

चित्रलेखा पाटील यांना विधानसभेवर महिला म्हणून प्रतिनिधी पाठविण्यासाठी महिला व गावांतील कार्यकर्ते कामाला लागले आहेत. चिऊताईंना निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते, महिला, तरुण मंडळी प्रचंड मेहनत घेत आहेत. मागील वर्षभरापासून जिल्ह्यातील महिलांवर झालेल्या अत्याचाराबाबत महिलांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. महिलांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी चित्रलेखा पाटील आमदार म्हणून सक्षम असल्याचा विश्‍वास महिलांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये चित्रलेखा पाटील यांचे नाव गाजत आहे. घराघरात शिट्टीचा आवाज घूमू लागला आहे. एक वेगळा उत्साह महिला कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे या निवडणूकीत चित्रलेखा पाटील यांचा विजय निश्‍चित असल्याचे चित्र दिसून येत आहे.

चित्रलेखा पाटील गेल्या अनेक वर्षांपासून महिलांच्या प्रश्‍नांबाबत काम करीत आहेत. गावे-वाड्यांमधील पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी कायमच कटिबद्ध राहिल्या आहेत. खेड्या-पाड्यात राहणार्‍या मुलींच्या शिक्षणाला गती मिळावी म्हणून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत हजारो मुलींना सायकल वाटप केले आहे. त्यामुळे त्यांच्यासारखी उच्चशिक्षित महिला आमदार म्हणून विधानसभेत असणे आवश्यक आहे. म्हणूनच आम्ही सर्व महिला प्रचाराच्या माध्यमातून त्यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करीत आहोत.

स्नेहल वारगे,
बेलोशी

Exit mobile version