तळा आरक्षणात महिलांची बाजी

17 प्रभांगामधे 9 ठिकाणी महिलांना संधी
। तळा । वार्ताहर ।
तळा नगरपंचायतीची सुधारीत आरक्षण सोडत सोमवारी (दि.15) जाहीर करण्यात आली. यामध्ये मागील आरक्षणाप्रमाणे यावेळीही महिलांनी बाजी मारली असून 9 महिलांना संधी मिळणार आहे. काही ठिकाणी बदल झाले असल्याने कही खुशी कही गम अशी स्थिती सर्वपक्षीयांमधे दिसून आली.
तळा नगरपंचायतीची मुदत गतवर्षीच संपली आहे. 27 नोव्हेंबर 2020 रोजी आरक्षणाची सोडत काढण्यात आली होती. राज्य निवडणूक आयोगाने आरक्षणाची सुधारित सोडत काढण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार रायगड जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार तळा नगरपंचायत सदस्यपदाच्या सुधारित आरक्षण सोडत डॉ.नानासाहेब धर्माधिकारी सभागृह पंचायत समिती तळा येथे पेण उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार आण्णापा कनशेट्टी, मुख्याधिकारी माधुरी मडके यांच्या नियंत्रणाखाली काढण्यात आली आहे.
सुधारीत आरक्षण सोडतीत प्रभाग क्रमांक 1 ना.मा.प्र. महिला प्रभाग, क्रमांक 2 सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 3 ना.मा.प्र. महिला प्रभाग क्रमांक 4 सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 5 सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 6 सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 7 सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 8 सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 9 अनु.जाती., प्रभाग क्रमांक 10 ना.मा.प्र., प्रभाग क्रमांक 11 सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 12 सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 13 अनु.जाती. महिला, प्रभाग क्रमांक 14 ना.मा.प्र., प्रभाग क्रमांक 15 सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 16 अनु.जमाती. महिला, प्रभाग क्रमांक 17 सर्वसाधारण महिला अशी आरक्षणे पडली आहेत.

Exit mobile version