| अलिबाग । वार्ताहर ।
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले याच्या जन्मदिवसाचे औचित्यत साधून धोकवडे केद्रांत जानेवारी महिन्याची महिला परिषद घेण्यात आली. यापरिषदेत अध्यक्ष निवड, अध्यक्ष पद ते आभार प्रदर्शन पर्यतच्या जबाबदायर्या या महिलांना देण्यात आल्या होत्या. यावेळी नमुना पाठ प्राची कदम यानी सादर केला. तर शिष्यवृत्ती सराव प्रश्न मजुषेची माहिती नेहा पाटील यांनी दिली. यावेळी मनिषा बलकावडे, कल्पना भोईर, जयश्री मोकल, उमेश ठाकूर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या पाटील तर आभार सायली नागवेकर यानी मानले.