। अलिबाग । प्रतिनिधी ।
पीएनपी बीएड महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधुन द्वितीय वर्गातील प्रशिक्षणार्थीनी महान प्रतिष्ठीत स्त्रीयांच्या वेशभूषा सादरीकरण केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रायगड भूषण पुरस्कार प्राप्त सुचिता साळवी उपस्थित होत्या. त्यांनी आजच्या दिनानिमित्त ’प्रशासकीय सेवेतील महिलांचे स्थान’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. रूतिषा पाटील यांनी भुषविले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशिक्षणार्थी पुजा थोरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रशिक्षणार्थी चैतन्य केळकर व आभार प्रदर्शन प्रशिक्षणार्थी नम्रता चोगले यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राचार्य नितेश मोरे, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.