तहसिल कार्यालयात महिला लोकशाही दिन


| पेण | प्रतिनिधी |

राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी मुलभुत हक्क दिलेला आहे. त्या अंतर्गत समस्याग्रस्त व पिडित महिलांना त्यांचे प्रश्‍न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होऊन न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारी, अडीअडचाणी यांची शासकिय यंत्रणेकडुन सोडवणुक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी महिला लोकशाही दिन आयोजन करण्यात योते. हा कार्यक्रम दर महिन्याच्या चौथ्या सोमवारी (या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणारा कामकाजाचा दिवस) तहसिल कार्यालय पेण या ठिकाणी राबविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी कृषीवलशी बोलताना दिली. पेण तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी त्यांना भेडसावणार्‍या समस्या, अडीअडचणी निर्भिडपणे मांडण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचा लाभ महिलांनी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

Exit mobile version