लकी ड्राँ कूपनच्या माध्यमातून बक्षिसांची खैरात
| खोपोली | प्रतिनिधी
जांबरुंग गावातील गरुडझेप ग्रामसंघाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान तसेच महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते. मिसेस जांबरुंग महिलेला मानाची पैठणी,महिलांसाठी लकी ड्राँ कूपनच्या माध्यमातून बक्षिसांची खैरात करण्यात आली होती. दिवसभर सुरू असलेल्या कार्यक्रमात महिला, तरूणींनी गर्दी करीत आनंद लुटला.
खालापूर तालुक्यातील जांबरूंग गावातील गरुडझेप ग्रामसंघाने सालाबाद प्रमाणे यंदाही महिला दिनाचे औचित्य साधत सांसकतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी एमएसआरसीएम व्यवस्थापक दडस, चौक प्रभाग समन्वयक अजीनाथ फुंदे, साजगांव समन्वयक भावना पाटील, समन्वयक करुणा कदम, सरपंच शिल्पा खांडेकर, उपसरपंच सचिन तांडेल यांच्या हस्ते दीप्रज्वलन करण्यात आले. व्यासपीठावर ग्रामपंचायत सदस्य मारुती गायकर, करुणा पाटील, पूजा कांबळे, मा.सरपंच रमेश खांडेकर, संदेश कांबळे, प्रशांत खांडेकर, संतोष सावंत, रायगड भूषण गोपीनाथ बुवा, पत्रकार सारिका सावंत ग्रामस्थ उपस्थित होते. जाबंरूंग ग्रामपंचायत हाद्दीतील महिला बचत गटाच्या माध्यमातून भाजी लागवड,लघु उद्योग करतात ते विविध कार्यक्रमात स्टाँल लावून विकतात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रात,पत्रकारितेत काम करणाऱ्या महिलांचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आले.
गावातील महिला बचत गटा मार्फत स्टॉल लावतात, भाजी लागवड करतात, लघु उद्योग करतात तसेच गावातील काही महिला विविध क्षेत्रात आहेत या महिलांना आत्मविश्वास वाढवा तसेच त्यांची प्रेरणा घेवून गावातील महिलांनी व समूहांनी सहभागी घ्यावा या करिता या कार्यक्रमाचे आयोजन करीत असे ग्रामपंचायत सीआरपी प्रगती सावंत यांनी सांगत इयत्ता 10 वी व 12 वीच्या परिक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थिनीचा सत्कार करत असल्याचे प्रास्ताविकातून सांगितले.
गावातील महिलांनी मोठा प्रतिसाद देत सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला.मिसेस जांबरुंग महिलेला मानाची पैठणी सरपंच शिल्पा खांडेकर यांनी दिली, आर टी झवेरी यांनी मिसेस जांबरुंग विजेतीला नथ, विविध क्षेत्रातील महिलांना बक्षिसे विनोद सावंत, विशेष समुहांसाठी बक्षिसे झोरबा प्रोडक्शन, सदस्य प्रसाद कदम, दुर्गेश खोपडे, पूजा कांबळे, कल्पना पाटील, यांनी सन्मानचिन्हे दिली. तसेच गावातील प्रतीक्षा जोशी, प्रिय तांडेल, रेश्मा खांडेकर, करुणा सावंत, रिया पाटील यांनी अनेक बक्षिस दिली. महिलांसाठी महिलांनी आयोजित केलेला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गरुडझेप ग्रामसंघाच्या अध्यक्ष, सचिव, खजिनदार, बचत गट अध्यक्ष, ग्रामपंचायत जांबरुंग, ग्रामस्थ यांच्यासह महिलांनी परिश्रम घेतले.






