| पनवेल | प्रतिनिधी |
दिवाळीत घरोघरी रांगोळी काढली जाते. त्यासाठी दरवर्षी काही ना काही नवीन ट्रेंड येत असतात. यंदा ओएचबी शीट, खुलन रांगोळीचे नावीन्य आणि वैविध्य बाजारपेठेत दिसून येत आहे. सध्या समाजमाध्यमांवर चांगल्याच ट्रेडिंगमध्ये असलेल्या या रांगोळ्या घेण्यासाठी महिलांची पसंती मिळत आहे.
बदलत्या काळानुरूप रांगोळी काढण्याच्या पद्धतीत बदल होत गेला आहे. काही दशकापूर्वी शेणाने सारवलेल्या जमिनीवर गेरूने सारवून नंतर रांगोळी काढण्यात येत असे. त्यानंतर केवळ फरशीवर गेरूने सारवून ठिपक्यांची रांगोळी काढण्यात येत असे. तसेच संस्कार भारतीच्या रांगोळी छोट्या प्रमाणात काढण्यास काहींनी सुरुवात केली, मात्र शहरात वाराच्या बाहेर उपलब्ध असलेली जागा कमी होत गेल्याने बघता बघता साच्यातील रांगोळी काढण्यास महिलांनी सुरुवात केली. यंदा बेट पूर्ण रेडिमेड रांगोळी बाजारात आल्या आहेत. फायबरचे रांगोळी साचेदेखील विक्रीसाठी आले आहेत. या साध्यात रंग, पुलांच्या पाकळ्या, धान्यांचा वापर करून रांगोळी साकारता येत आहे. या रांगोळीचे नावीन्य असल्यामुळे त्यांची विक्री चांगली होत आहे. तरीदेखील त्यानंतरची पसंती ही साध्यात रांगोळीला मिळत असल्याचे चित्रदेखील बाजारात दिसत आहे. ही रांगोळी काढण्यासाठी रंगमिश्रित रंग वापरले जात असल्याने कच्चे रंग विकत घेण्याऐवजी रंगमिश्रित रांगोळी घेण्याकडे अनेकांचा कल आहे. शहरातील लहान-मोठ्या दुकानात वैविध्यपूर्ण रांगोळी विक्रीसाठी उपलब्ध झाल्यात आहेत. त्याचप्रमाणे विविध नक्षीदार रांगोळीच्या जाळ्या, स्टिकर्स, शुभ चिन्नों, उंबरठा रांगोळी, फायबरचे रांगोळ साचे घेण्यासाठी महिलांची पसंती मिळत आहे.
रेडिमेड रांगोळी डिझाइन्सकडे महिलांचा कल
