। उरण । वार्ताहर ।
महिला ओपन क्रिकेट लेदर बॉल टूर्नामेंट पेण येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या स्पर्धेला खेळाडू व जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला. मान्यवरांची साथ यामुळे स्पर्धा उत्तमपणे पार पडली. याा स्पर्धेसाठी राजश्री अडबळ आणि नीलम पाटील यांनी सहकार्य केले. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष चंद्रकांत मते, उपाध्यक्ष अनिरुद्ध पाटील, पावसकर, बहुतुले, किरीट पाटील, प्रशांत माने यांचे मोलाचे सहकार्य लाभले.







