नेरळ फाटक ते साई मंदिर रस्त्याच्या कामाला प्रारंभ

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान-नेरळ-कळंब या राज्यमार्ग रस्त्यावर नेरळ रेल्वे फाटक ते निर्माण नगरीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अनेक महिने थांबले होते. त्या भागातील रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाला सुरुवात झाली आहे. या रस्त्याच्या आजूबाजूचे अतिक्रमण काढण्यात आल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला संरक्षण भिंत देखील बांधण्यात येत आहे.

नेरळ रेल्वे फाटकापासून साई मंदिर या भागातील 200 मीटर लांबीचा रस्ता गेली अनेक वर्षे अरुंद होता. मात्र, त्यावेळी माथेरान -नेरळ- कळंब रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण होत असताना रेल्वे फाटक ते साईमंदिर भागातील निर्माण नगरी पर्यंतचा रस्ता अरुंदच होता. मात्र, आता नेरळ रेल्वे फाटक ते साई मंदिर भागातील 200 मीटर लांबीच्या रस्त्यावर काँक्रीटीकरण सुरू झाले आहे. रस्त्यावर दोन गाड्यांची वाहतूक होईल अशाप्रकारे रुंदीकरण करून काँक्रीटीकरण केले जात आहे. नेरळ -कळंब हा राज्यमार्ग रस्ता मुरबाडकडे जाणारा महत्वाचा रस्ता असल्याने तसेच नाशिक भागातून माथेरान या पर्यटनस्थळी येणारे पर्यटक यांच्यासाठी देखील महत्वाचा असल्याने रस्त्याचे काँक्रीटीकरण व्हावे यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांचा सतत पाठपुरावा सुरू आहे.

जुना साकव पूल तोडला
निर्माण नगरी भागाच्या वळणावर असलेले जुना साकव पूल नवीन रस्त्याच्या कामात तोडण्यात आले आहे. येथे नवीन पुलाचे काम एएसआयडीसीकडून सुरू आहे. त्यामुळे अरुंद साकव पुलाचा जागी रुंद रस्ता नवीन पुलामुळे निर्माण होणार आहे.
Exit mobile version