। उरण । वार्ताहर ।
शहराच्या सौंदर्यात भर घालण्यात मोठे योगदान असणार्या महापालिकेच्या सफाई कर्मचार्यांचे रक्षाबंधन सणानिमित्त औक्षण करुन त्यांना राख्या बांधण्यात आल्या. दिलीप आमले आणि संगीता आमले यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. ‘स्वच्छ नवी मुंबई, आमची नवी मुंबई’ असा नावलौकिक मिळविण्यासाठी या साफसफाई कर्मचार्यांचा मोठा वाटा आहे. सतत दहा वर्षे आपला माणूस दिलीप आमले संचालक अंकिता मोटार ट्रेनिंग स्कुल नेरूळ व शिव वाहतूकसेवा नवी यांच्या संयुक्त विद्यमाने संगिता आमले अध्यक्ष त्रिमुर्ती महिला मंडळ नेरूळ यांच्या सहकार्याने रक्षाबधंन हा पवित्र सण नवी मुंबई महानगर पालिका कर्मचार्यांना बरोबर साजरा करून आनंद व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमात छाया भोस उपाध्यक्षा, संगिता दाते, अंकिता आमले यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या. हा कार्यक्रम सकाळी सहा वाजता अंकिता मोटार ट्रेनिंग स्कुल येथे पार पडला. यावेही साफसफाई कर्मचार्यांना औक्षण करून सन्मान करण्यात आला. यावेळी नेरूळ विभागातील अनेक साफसफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.