खोपटा रस्त्याच्या कामाला सुरुवात

| उरण | प्रतिनिधी |

उरण पुर्व विभागातील गावांना जोडणाऱ्या खोपटा या महत्वाच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. या रस्त्याचा शुभारंभ उद्योजक पी.पी. खार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या रस्त्यावरील 2 किलोमीटर लांबीचा रस्ता रुंदीकरण व काँक्रीटीकरण करण्यासाठी सुमारे 7 कोटींचा निधी सार्वजनिक बांधकाम खात्याने मंजूर केला आहे.

उरण, द्रोणागिरी शहर व जेएनपीए बंदर यांना उरण पुर्व विभागातील गावांना जोडणारा खोपटा पुल ते कोप्रोली हा महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ असल्याने या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था होऊन सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असे. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण करण्यासाठी मनसेचे तालुकाध्यक्ष ॲड. सत्यवान भगत व युवा नेते गौरव ठाकूर यांनी सातत्याने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली होती. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खोपटा रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यांच्याकडून या रस्त्याच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याला सुमारे 7 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याचे काम केले. पी.पी.खारपाटील कन्स्ट्रक्शन कंपनीने नव्या वर्षाच्या शुभारंभ प्रसंगी खोपटा या रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आले. यावेळी उद्योजक राजा खारपाटील, धनेश गावंड, राणी म्हात्रे, जीवन गावंड, शशिकांत पाटील, सरपंच विशाखा ठाकूर, देवेंद्र पाटील, समीर खारपाटील, सरपंच रोशन पाटील, मुकूंद गावंड, बबन पाटील, सुशांत पाटील व प्रवाशी नागरीक उपस्थित होते.

Exit mobile version