म्हात्रे फाटा ते धोकवडे रस्त्याच्या कामाला सुरुवात

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील म्हात्रे फाटा ते धोकवडे भाग या अडीच कि. मी. रस्त्याच्या कामाचा शुभारंभ सोमवारी झाला. जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती दिलीप भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत धोकवडेच्या सरपंच जयश्री म्हात्रे यांच्या हस्ते पार पडला.
मांडवा बंदरालगत असलेल्या धोकवडे या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. येथील कॉटेजेस पर्यटनावर अधारीत आहेत. त्यामुळे स्थानिकांना यातून रोजगार मिळतो. पर्यटकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात. धोकवडेमध्ये पर्यटन वाढीला अधिक चालना मिळावी यासाठी
समाजकल्याण सभापती भोईर यांनी म्हात्रे फाटा ते धोकवडे भाग पर्यंतचा रस्ता तयार करून देण्याचे आश्‍वासन दिले होते. अखेर या आश्‍वासनाची पुर्ती करण्यात आली आहे. शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या आमदार फंडातून या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्याच्या कामाला सोमवारी सुरुवात केली आहे. चार दिवसात या रस्त्याचे काम पुर्ण होईल असा विश्‍वास तेथील कंत्राटदाराने व्यक्त केला आहे. यावेळी गुरुनाथ म्हात्रे, सचिन म्हात्रे, रवि म्हात्रे, महेश माने, हरेश भोईर, गणेश भोईर. अशोक थळे, महम्मद कुर, आदींसह धोकवडे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामसेवक, व ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version