सुरक्षेची व्यवस्था नसल्यामुळे अपघाताची शक्यता
| खोपोली | प्रतिनिधी |
पेण – खोपोली रस्त्यावरील वावोशी फाट्यावरून महानगर गँसलाईनचे काम रस्त्याच्या कडेलाच सुरू आहे. याठिकाणी मोठा खड्डा केला असून, सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिगेट आणि सुरक्षेची व्यवस्था नसल्यामुळे खड्यात पडून अपघाताची शक्यता आहे.
रस्त्याचा काही अंतर सोडून खोदकाम केलं पाहिजे. परंतु, सर्व नियम ढाब्यावर बसवून रस्त्याच्या कडेलाच पाईपलाइन टाकली जात आहे. खोदकाम केल्यानंतर रस्त्याच्या बाजूला बॅरिगेट लावले नसल्यामुळे अपघात घडण्याची शक्यता आहे. तसेच वावोशी फाट्यावर मोठी बाजारपेठ असल्यामुळे बाजारहाटासाठी छत्तीशी विभागातून महिला अबावृध्द येत आहेत. शाळकरी मुलेही पायी याठिकाणी शाळेत जातात. वावोशी फाट्यावर एका दुकाणासमोरच खड्डा करून गॅसलाईन टाकण्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे. रस्त्याच्या अगदी कडेलाच गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असल्याने भविष्यात महानगर गॅसलाईन गळतीमुळे मोठा अनर्थ घडू शकतो, अशी चिंता स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहे. परंतु, संबंधित ठेकेदार, एजन्सी नियम ढाब्यावर बसवून काम करीत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
