फोर्कलिफ्टचे चाक पोटावरून गेल्याने कामगाराचा दुर्दैवी अंत

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेलजवळील सोमाटणे गावाजवळ कोनसावळा मार्गावर असलेल्या केरी इंडेव्ह लॉजिस्टिक कंपनीत घडलेल्या एका भीषण अपघातात एका कामगाराचा दुर्दैवी अंत झाला. मोहन गोमा म्हस्कर (55) असे या कामगाराचे नाव असून, ते नारपोली गावचे रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, मोहन म्हस्कर हे दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास कंपनीच्या आवारात काम करत होते. यावेळी कंटेनर उचलण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या फोर्कलिफ्ट वाहनाच्या मागील चाकाखाली ते अचानक सापडले. फोर्कलिफ्टचे चाक त्यांच्या पोटावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत त्यांचा अंत झाला होता. या दुर्दैवी घटनेमुळे म्हस्कर कुटुंबियांसह त्यांच्या केरी इंडेव्ह लॉजिस्टिकमधील सहकारी कामगारांमध्ये शोककळा पसरली असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version