लिफ्ट कोसळून कामगाराचा मृत्यू

| पनवेल | प्रतिनिधी ।

बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून बांधकाम साहित्याच्या लिफ्टसह खाली कोसळून एका तरुण कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उलवे येथे घडली. मुकेश कुमार रामनाथ (23) असे मृत कामगाराचे नाव आहे. कामगारांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता गंभीर निष्काळजी केल्याने उलवे पोलिसांनी संबंधित बांधकाम व्यावसायिक शिवदास मोहिते (30) आणि कंत्राटदार पवन कुमार या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version