टीजी कंटेनर यार्डकडून कामगारांच्या बाईक रस्त्यावर

बेकायदेशीर पार्किंग हटविण्याची प्रवाशांची मागणी
उरण | वार्ताहर |
गव्हाण फाटा चिरनेर रस्त्यावर वेश्‍वी येथे टीजी कंटेनर यार्ड आहे. या यार्डने पार्किंग जागा न ठेवल्याने कामगारांच्या बाईक रस्त्यावर आडव्या तिडव्या लावल्या जातात. यामुळे या गाड्यांचा अडथळा इतर प्रवासी वाहनाना होत अअसून, त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

याबाबत कामगारांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, कामगार कामावर आल्यावर त्या कामगारांच्या वाहनांची सुरक्षितता ही कंपनीची जबाबदारी आहे. मात्र, ही जबाबदारी कंपनीने झटकून कामगारांच्या गाड्या आतमध्ये घेत नाहीत, त्यामुळे आम्हाला आमच्या गाड्या नाइलास्तव रस्त्यावर लावाव्या लागत आहेत. आमच्या गाड्या सुरक्षित नाहीत व याचा अडथळा व त्रास इतर प्रवासी वाहनांना होत आहे. तरी या रस्त्यावर होणार्‍या बेकायदेशीर पार्किंगकडे सा.बां. खाते, उरण यांनी जातीने लक्ष घालून बेकायदेशीर पार्किंग हटवून कारवाई करण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात आहे.

कंटेनर पार्किंग व बाईक पार्किंगसाठी बाजूला पार्किंग व्यवस्था असून, तेथे सुरक्षिततेसाठी वॉचमन असूनसुद्धा कामगार तेथे आपल्या बाईक पार्किंग न करता गेटसमोरील रस्त्यावर पार्किंग करतात. याबाबत आम्ही त्याना वारंवार सूचनासुद्धा दिल्या आहेत.
श्री. प्रशांत, टीजी, एच .आर.

Exit mobile version