। नेरळ । वार्ताहर ।
रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या नेरळ विकास प्राधिकरण मधील निधी मधून नेरळ ग्रामपंचायत हद्दीत अनेक विकासकामे सुरु आहेत. नेरळ ममदापुर संकुल विकास प्राधिकरण मधून नेरळ, ममदापुर आणि कोल्हारे या तीन ग्रामपंचायतीमधील विकासकामे करण्यासाठी निधी दिला जातो. त्या निधीमधून नेरळ ग्रामपंचायत हद्दीत अनेक रस्त्यांची तसेच लहान साकव पुलांची आणि गटार बांधकाम करण्याची कामे सुरु आहेत. त्यात नेरळ पूर्व भागात गंगानगर येथील अंतर्गत रस्त्याचे काम, मातोश्री नगरातील दोन अंतर्गत रस्त्यांची कामे, उमानगर भागातील रस्त्यांचे काम, उमनगर येथील स्मशानभूमीचे नूतनीकरण आणि दुरुस्ती मंजूर आहे. निर्माणनगरी येथील नेरळ-कळंब रोडला जोडणारा रस्ता, साईकृपा सोसायटी ते एसटी स्टॅन्डला जोडणारा रास्ता, निर्माणनगरी येथील नाल्यावर साकव, मुख्य नाल्यावर गटार बांधकाम, कोल्हारे रस्त्यावर मातोश्रीनगर नाल्यावर साकव, नेरळ गावातील लव्हाळवाडी येथील अंतर्गत रस्ता, मोहाची वाडी येथील अंतर्गत रस्त्याचे काम राजेंद्रगुरू नगर, कुंभारआळी, सम्राटनगर भागातील रस्त्याचे काम करण्यासाठी नेरळ विकास प्राधिकरण मधून निधी मंजूर झाला आहे. त्या निधीमधून बापूराव धारप सभागृह ते सहयोग सोसायटी रस्ता आणि गटार,अंबेमाता हॉल ते दहिवलीकर यांचे घर येथील रस्ता करणे ही कामे मंजूर आहेत. त्याचवेळी कुंभारआळी मधील घोडविदे घरापासून दलित मित्र पी. डी. गायकवाड चौक आणि दलित मित्र पी. डी. गायकवाड चौक ते राजेंद्र गुरूनगर मधील कोचुरे यांच्या घरापर्यंत रस्ता बनविणे ही कामे मंजूर असून त्यासाठी नेरळ ममदापुर संकुल विकास प्राधिकरण मधून एक कोटी 40 लाखाचा निधी मंजूर आहे.