अंबुजा सिमेंट कंपनीतर्फे अलिबाग येथे कार्यशाळा

। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
अंबुजा सिमेंट कंपनीतर्फे अलिबाग येथे राजू जैन यांच्या वर्धमान एंटरप्राइजेस बिल्डिंग मटेरिअल सप्लाय या व्यापारी संकुलात कॉन्ट्रॅक्टर (ठेकेदार)यांच्या करीता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळा सोमवार (दि. 11) रोजी आयोजित केली होती.
या कार्यशाळेमध्ये ठेकेदारांना अंबुजा सिमेंटचे सेल्स डायरेक्टर पंकज मोटा, टेक्निकल हेड (वेस्टर्न रिजन) जिग्नेश गांधी व टेक्निकल सर्व्हिस हेड प्रवीण पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. त्यावेळी अंबुजा प्लस या सिमेंट विषयी माहिती देण्यात आली.
या कार्यशाळेत भगवान मालपाणी, प्रधान अँड कंपनी येथून पंढरी शेठ, निलेश सेल्स पोयनाड येथून राकेश व निलेश जैन व रोहित सेल्स येथून रोहित जैन व वर्धमान एंटरप्रायझेस येथून मयूर व यश जैन उपस्थित होते. अंबुजा कंपनीतर्फे प्रशांत सेनाड, निलेश सिंन्हा, धनंजय जोशी स्वप्नील भागवत उपस्थित होते.

Exit mobile version