। माणगाव । प्रतिनिधी ।
येथील जे. बी सावंत एजुकेशन सोसायटीच्या टिकमभाई मेथा कॉमर्स कॉलज आणि सविता नीलकंठ सावंत जुनिअर कॉमर्स कॉलजमध्ये नवीन शैक्षणिक धोरण 2020 विषयी सविस्तर कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी जवळपास 120 विध्यार्थी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथील सहाय्यक प्रा. साहिल कुरेशी व प्रा. राजेश्वर धनपलवार यांनी नवीन शैक्षणिक धोरण 2020 विषयी इयत्ता 11 वी,12 वी व पदवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या धोरण विषयी असलेले समज, गैरसमज याविषयी चर्चा केली. 1986 नंतर 2020 मध्ये हे शैक्षणिक धोरण बदलण्यात आले असून त्याचा फायदा विद्यार्थ्यांना कसा होणार आहे. या विषयी मार्गदर्शन केले. यावर्षी महाराष्ट्र शासन सर्व विद्यापीठात व त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयात या नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली आहे. त्यानुसार नवीन विषय नवीन अभ्यासक्रम सुरु झाले आहेत. आता यापुढे 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम व 1 वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम असणार आहे. इयत्ता 11 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक धोरणाची माहिती व्हावी यासाठी हा उपक्रम केला होता.