| माणगाव | वार्ताहर |
छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचालित जय जवान जय किसान माध्यमिक विद्यालय वाघेरी येथे शाळांतर्गत आविष्कार-कल्पकतेकडून कृतीकडे 2024-25 विज्ञान प्रदर्शन मंगळवारी 7 जानेवारी रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन वारंगी ग्रामपंचायतीचे सरपंच दत्ताराम ढेबे, शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश देवरुखकर यांच्या हस्ते करण्यात आले.
विज्ञान प्रदर्शनात सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जलविद्युत, पाणी शुद्धीकरण, औषधी वनस्पती, वैद्यकीय शास्त्र इत्यादी विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रतिकृती सादर केल्या. सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश देवरुखकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच संस्था पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.
दरम्यान, या विज्ञान प्रतिकृतीतून प्रथम क्रमांकाची प्रतिकृती विभाग स्तरावर शाळेचे प्रतिनिधित्व करणार आहे.