जागतिक ऊर्जा संवर्धन दिवस साजरा

उरणच्या महिलांना दिले प्रशिक्षण
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कौशल्य विकास व उद्योजगता मंत्रालय भारत सरकारच्या यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारी जन शिक्षण संस्थान रायगड या योजनेत कार्य करत असणार्‍या सहाण-अलिबाग येथे अपारंपारिक ऊर्जा स्रोत उपयोगिता मार्गदर्शन कार्यक्रम प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन सोमवारी (दि.14) सहाण-अलिबाग येथे संपन्न झाले व जागतिक ऊर्जा संवर्धन दिवस साजरा करण्यात आला. सदर प्रशिक्षण वर्गात सांसद आदर्श ग्राम खोपटा बांधपाडा उरणच्या महिलांना प्रशिक्षण वर्गाचा लाभ झाला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी जन शिक्षण संस्थान रायगडचे अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, रत्नप्रभा बेल्हेकर बोर्ड मेंबर, संचालक विजय कोकणे, जन शिक्षण संस्थान रायगडचे कर्मचारी प्रतिक्षा चव्हाण अकाउंट मॅनेजर, कल्पना म्हात्रे, सुकन्या नांदगावकर सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, ओंकार बोरकर, स्नेहा म्हात्रे व प्रशिक्षणार्थींच्या उपस्थितीत सदर उद्घाटन समारंभ कोरोनाजन्य परिस्थितीचे सर्व नियम पाळून उत्साहात पार पडला. सदर प्रशिक्षण वर्गात जे. एस. एस. रायगडचे बेड कंपोस्टिंग प्रोजेक्ट, सोलर हब, बर्ड वॉटर फीडर कॉर्नर, व्होकेशनल ट्रैनिंग डिस्प्ले, हेल्थ केअर कॉर्नर, ब्युटी  वेलनेस कॉर्नर, रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रोजेक्ट, स्वच्छता जन जागृती फिल्म सदर बाबींची माहिती देण्यात आली.

Exit mobile version