जागतिक हात धुणे दिवस

। सुतारवाडी । वार्ताहर ।

कुडली येथील रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळेत ए.पी.जी.अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून शाळेत ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला. या वाचन प्रेरणा दिनामध्ये पहिली ते सातवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी अब्दुल कलाम यांच्या विषयी माहिती देताना मोहन राठोड यांनी सांगितले की, कलाम हे 2002 ते 2007 या कालावधीत आपल्या देशाचे राष्ट्रपती होते. त्यांना वैज्ञानिक संशोधनामुळे भारतरत्न देण्यात आले. यानंतर ‘जागतिक हात धुणे दिवस’ या निमित्त सर्व विद्यार्थ्यांना हात कसे धुवावे, हे प्रात्यक्षिक करून दाखवून सर्व विद्यार्थ्यांचे हात धुवून घेण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुशीला म्हात्रे, मोहन राठोड, सारिका पोटे व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version