नांदगावमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन

| कोर्लई | प्रतिनिधी |

जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील आयुष हॉस्पिटल, रायगड इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन आणि नूतन स्कूल ऑफ नर्सिंग यांच्या संयुक्त विद्यमाने मानसिक आरोग्याविषयी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येऊन जनजागृती करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढून, पथनाट्य सादर करून समाजाला मानसिक आरोग्याचे महत्त्व पटवून दिले.

मानसिक आरोग्याविषयी समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे, मानसिक आरोग्याशी संबंधित गैरसमज व कलंक दूर करणे आणि प्रत्येक व्यक्तीने आपल्या मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणे आवश्यक आहे, हा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅलीद्वारे मानसिक आरोग्याचे महत्त्व, स्वास्थ्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन आणि गरज भासल्यास योग्य मदत घेण्याचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवून पथनाट्य सादर केले.

यावेळी अकॅडमिक डायरेक्टर तथा प्राध्यापक आणि प्रा.डॉ. सुधादेवी सदानंद यांनी मानसिक आरोग्याचे प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्व स्पष्ट केले. मानसिक स्वास्थ्यामुळे भावनिक संतुलन राखण्यास, दैनंदिन आव्हानांचा सामना करण्यास, नातेसंबंध दृढ करण्यास आणि आनंदी व उत्पादक जीवन जगण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसह समाजातील प्रत्येक घटकाने मानसिक आरोग्याविषयी जागरूक राहणे आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. आयुष हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. अनिल गोस्वामी यांनी रुग्णसेवेबाबत हॉस्पिटलची भूमिका स्पष्ट केली. मानसिक आरोग्य हे सर्वांगीण आरोग्याचा महत्त्वाचा आधार असल्याचे सांगितले.

Exit mobile version