। धाटाव । वार्ताहर ।
रोह्यात गौराईचे काल जल्लोषात आगमन झाल्यानंतर आज पारंपरिक पद्धतीने मनोभावे पूजन करण्यासाठी महिला वर्गाची चांगलीच लगबग पहावयास मिळाली.नवनवीन विविध रंगाच्या साड्या परिधान करून आज गौराईचे पूजन करताना एकत्र सुहासिनिचे वाण घेण्यात महिलांचा चांगलाच उत्साह पहावयास मिळाला.गणरायाच्या आगमना बरोबर काल गौराईचे आगमन झाल्या नंतर आज सकाळ पासून गौरीचे पूजन करण्यासाठी विविध फुलांनी सजावट करून पूजनासाठी महिलांची लगबग पाहण्याजोग होती.आपल्या घरात सुख,समृध्दी नांदावी यासाठी गौराईचा ओवसा सुहासिनीनीवाण घेतले.