। पनवेल । प्रतिनिधी ।
लग्नाच्या तयारीत असलेल्या कुटुंबाच्या आनंदावर पाणी फिरवणारी घटना सीबीडीत घडली. खारघर येथील एका कुटुंबाने लग्नाचा बस्ता घेऊन रात्रीच्या जेवणासाठी थांबले असताना, चोरट्यांनी त्यांच्या कारची काच फोडून लॅपटॉप, दीड लाखांची रोकड, महत्त्वाचे दस्तऐवज चोरून नेले. सचिन बबन अडसूळ यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनांना लक्ष्य करून चोरी करणाऱ्या टोळीचा हा प्रकार असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, शहरात काही दिवसांपासून पार्किंगमध्ये उभ्या गाड्यांमध्ये चोरीच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वाहनात मौल्यवान वस्तू न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
कारची काच फोडून दीड लाखांची चोरी
