। सोगाव । वार्ताहर ।
लाईफ फाऊंडेशनतर्फे झिराड, चोंढी, किहीम आदिवासीवाडी आणि लक्ष्मी नारायण विद्यामंदिर टाकादेवी-बहिरोळे या शाळांमध्ये योग दिवस साजरा करण्यात आला. योग प्रशिक्षक हर्ष संदेश काठे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना विविध योगासने शिकवण्यास मेहनत घेतली. चारही शाळेच्या मुख्याध्यापकांनी दी लाईफ फाऊंडेशन चे आभार व्यक्त केले. यावेळी रा.जि.प. समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, झिराड माजी सरपंच महेश माने आणि झिराड तंटामुक्ती माजी अध्यक्ष रवींद्र म्हात्रे, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र झिराड प्रमुख तसेच कर्मचारी यांनी प्रशिक्षणास उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.