नाना पाटील हायस्कूलमध्ये योग दिन साजरा

। पेझारी । वार्ताहर ।
योग हा केवळ शारीरिक व्यायाम किंवा रोग बरे करण्याची कृती नसून जीवन सुधारण्याचा मार्ग आहेफआजच्या वैद्यकीय संशोधनाने हे सिद्ध केले आहे. योग हे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या मानवजातीसाठी वरदान ठरलेले आहे. योगाचे महत्व जाणून आणि शिक्षण विभागाच्या आदेशाचे पालन करत मआठवा अंतरराष्ट्रीय योगदिनफको. ए. सो. ना. ना पाटील हायस्कूल पोयनाड येथे 6 महाराष्ट्र बटालियन एनसीसी., आरएसपी. आणि गाईड पथकांमार्फत साजरा करण्यात आला. यावेळी प्रथम एनसीसी प्रमुख समाधान भंडारे यांनी योग् शिक्षणाचे महत्त्व विशद केले. नंतर राजेंद्र म्हात्रे यांनी योगाची प्रात्यक्षिके करून दाखविली. यामध्ये विद्यार्थ्यांसोबत मुख्याध्यापक के. के. फडतरे प्रमुख संजय डोंगरे, एस. के. पाटील तसेच इतर सेवक ही सहभागी झाले होते.योगदिनाचे औचित्य साधून चित्रकला शिक्षक देवेंद्र पाटील यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता एनसीसी पथकातर्फे खाऊ वाटप करून झाली.

Exit mobile version