रसायनी येथे योग सत्राचे मार्गदर्शन

| रसायनी | वार्ताहर |

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रसायनी मोहोपाडा येथील पिल्लई एचओसी कॉलेजच्या सहकार्याने हार्टफुलनेसच्यावतीने शांतता, जागरुकता व परिवर्तनासाठी शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पिल्लई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन व केंद्र सरकार यांच्या कॉमनवेल्थ कौन्सिल यांच्यात एक विद्यार्थी यांना बुद्धी कौशल्य, खेळ आणि इतर कार्यक्रमाद्वारे सक्षम करण्यासाठी सामंजस्य करार झाला. यावेळी योग तज्ञांचे योग सत्र मार्गदर्शन, प्रेरणा आणि उन्नतीसाठी तज्ञांनी मार्गदर्शन केले.

दरम्यान, कॉमनवेल्थ युथ कौन्सिल ही केंद्र सरकारची अधिकृत प्रतिनिधी संस्था म्हणून आंतरराष्ट्रीय स्थरावर मान्यता प्राप्त असून युवा-नेतृत्वाची संघटना आहे. तिचे अनेक देशात सदस्य असून कार्यरत आहेत. पिल्लई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स भारतातील एक अग्रगण्य शैक्षणिक समूह संस्था असून शैक्षणिक क्षेत्रात अतिशय उत्कृष्ट कार्य करणारी शैक्षणिक संस्था आहे. विद्यार्थी यांच्या विकासाला चालना देण्यासाठी त्यांचे कार्य सुरू असते. या सामंजस्य कराराचा उद्देश कॉमनवेल्थ युथ कौन्सिल आणि पिल्लई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स यांच्यात दीर्घकालीन विकास मूल्य, सहकार्य स्थापित करणे आहे, क्षमता निर्माण, कौशल्य वाढ आणि नागरी सहभाग या उद्देशाने कार्यक्रमांद्वारे तरुणांना सक्षम बनविण्यावर लक्ष केंद्रित करणार आहेत. पिल्लई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सने इंग्लंडमध्ये मुख्यालय असलेल्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संघटनेसोबत, प्रभावी युवा विकास उपक्रम आणि जागतिक सहकार्य सुरू करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे, हा एक ऐतिहासिक क्षण आहे. या कार्यक्रमासाठी भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत माय भारत युवा विभाग आणि खेलो इंडिया यांच्याशी देखील सहकार्य केले आहे.

Exit mobile version