| माणगाव । वार्ताहर ।
माणगाव क्रांती नगर येथील रहिवाशी योगेश गोपीनाथ पवार यांचे बुधवार दि.31 ऑगस्ट रोजी 2022 रोजी माणगाव येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 49 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मित निधनाने पवार कुटुंबियांवर तसेच मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे. त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार दि.9 सप्टेंबर रोजी श्री क्षेत्र हरिहरेश्वर याठिकाणी होणार असून उत्तरकार्य विधी रविवार दि.11 सप्टेंबर रोजी राहते घरी क्रांतीनगर माणगाव येथे होणार असल्याची माहिती त्यांचे निकटवर्तीय अविष्कार फाऊंडेशनचे जिल्हा कार्याध्यक्ष शंकर शिंदे यांनी दिली.