तरुण पिढी नशेच्या आहारी

उरण परिसरात गांजाची खुलेआम विक्री
| उरण | वार्ताहर |

उरण चारफाटा, द्रोणागिरी नोड व इतर ठिकाणी गांजाची खुलेआम विक्री करून तरुण पिढी बरबाद करण्याचे काम रोज होत आहे. शाळकरी मुलांसहीत यात काही अट्टल गुन्हेगारांना गांजा सहज उपलब्ध होऊ लागला आहे. 10 ते 50 रुपयांपर्यंत या गांजाची विक्री सर्रास होत आहे. ग्रामीण भागातील मुलेही या नशेच्या आहारी जात आहेत.

शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. परिसरांत 14 ते 16 वयोगटांतील शालेय मुले याच्या नशेच्या अधिक आहारी जात असल्याचे पुढे आले आहे. सामाजिक बदल होताना गांजासारख्या नशेच्या अमली पदार्थांची ही खुलेआम विक्री निश्‍चितच डोकेदुखी देणारी आणि तरुण पिढीला बरबाद करणारी आहे. याप्रकरणी संबंधित लोकांनी कारवाई करणार्‍या यंत्रणेला अनेक वेळा सांगितले तरी ठोस कारवाई होत नाही. गांजा तयार करणार्‍या, विकणार्‍या अशा सगळ्यांनाच कायद्याचा जरब बसेल, अशा कारवाईची गरज आहे.

Exit mobile version