प्रेयसीचा लग्नाला नकार; तरुणाने संपविले जीवन

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी|

अलिबागमधील रोहिदास नगर येथे राहत्या घरात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रेयसीने लग्न करण्यास नकार दिल्याने त्याने जीवन संपविले. ही घटना बुधवारी (दि.15) रात्री ते गुरुवारी (दि.16) पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय युवराज निकाळे असे या तरुणाचे नाव आहे. हा तरुण मुळचा नाशिक येथील रहिवासी असून सध्या तो अलिबागमधील रोहिदास नगर येथे राहणारा आहे. त्याचे वडील सेवानिवृत्त पोलीस आहेत. गेल्या अनेक वर्षापासून अलिबागमधील एका व्यापाऱ्याच्या मुलीसोबत त्याचे प्रेम होते. दोघे पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र काही दिवसांपुर्वी तिने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला. मंगळवारी(दि.14) नाशिक येथील कार्यक्रम आटोपून तो अलिबागमध्ये आला. बुधवारी (दि.15) रात्री घरात असताना त्याने एका दोरीने गळफास घेतला. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, अक्षयच्या मृतदेहासमोर त्याच्या प्रेयसीचा भलामोठा फोटो होतो. त्या फोटोसमोर त्याने गळफास घेतला असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version