। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठणे येथील खडकाळी भागात राहणारा तरुण वैभव महिपत काजारे (वय- 25) वर्षे याने राहत्या घरात नैराश्यातून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.3) खडक आळी येथील एक चाळीत घडली आहे.
या संदर्भात नागोठणे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वैभव हा खडक आळीतील चाळीत एका खोळीत भाड्याने राहत होता. वैभव यास कोणताही कामधंदा नसल्याने यामुळे आलेल्या नैराश्यातून घरात कोणीही नाही याचाच फायदा घेत तो राहत असलेल्या घरामधील छताला असलेल्या लाकडी कडीला साडीच्या साहय्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तानाजी नारनवर यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या घटनेची नोंद नागोठणे पोलिस ठाण्यात करण्यात आली असून या संदर्भात अधिक तपास पोलीस निरीक्षक नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. पाटील हे करत आहेत.