। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठण्यातील गवळ आळी भागात आपल्या कुटूंबासह भाड्याने राहणारे व येथील एका कंपनीत कंत्राटी पद्धतीने कामावर असलेले बबलूप्रसाद रामेश्वरप्रसाद चंद्रवंशी (वय ४५) मूळ रा. खुसरूपूर, जि.फटका (बिहार) याने बाथरूम मधील दांडीला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना शनिवार दि. ६ आॅगस्टच्या रात्री घडली आहे. बाथरूम मध्ये गेलेला बबलूप्रसाद रविवारी पहाटेच्या वेळी खुप वेळ होऊनही बाहेर येत नाही म्हणून त्याच्या पत्नीने बाथरूमच्या एका फटीतून आत पाहिले असता पतीने गळफास घेतलेला पाहून त्यांना धक्का बसला. नंतर त्यांच्या मुलाने बाथरूमचा दरवजा तोडून आत प्रवेश करुन बबलूप्रसादला बाहेर काढले असता त्याचे शरीर पूर्णतः थंड पडल्याचे मुलाच्या लक्षात आले. याआधीही बबलूप्रसाद याने स्वतःला आपल्या राहत्या खोलीत बंद करुन ठेवल्याची माहिती त्याच्या मुलाने पोलिसांना दिली. त्यामुळे मानसिक संतुलन बिघडल्यानेच त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. या घटनेची नोंद नागोठणे पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास नागोठणे पोलिस करीत आहेत.