| नागोठणे | वार्ताहर |
नागोठण्याजवळील वांगणी येथील 25 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.20) रोजी दुपारी घडली आहे. या प्रकरणी नागोठणे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, नागोठण्याजवळील वांगणी येथील 25 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तरुणीच्या लग्नसंदर्भात गेल्या 2-3 वर्षांपासून बोलणी सुरू होती. मात्र, तिचे लग्न जमत नसल्याने तिला नैराश्य आले होते. याच नैराश्यातून गेल्या 8-10 दिवसांपासून ती कुणाशी बोलत नव्हती. मंगळवारी दुपारी घरात कुणी नाही हे पाहून तरुणीने नैराश्यातून घरातील हॉलमधील भालाला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास तरुणीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी नागोठणे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजहंस नागदिवे हे पुढील तपास करीत आहेत.