| अलिबाग | वार्ताहर |
आविष्कार फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार’ गोंधळपाडा शाळेतीली शिक्षक दीपक रघुनाथ पाटील यांना जाहिर करण्यात आला होता. कोल्हापूर-पन्हाळगड येथे 18 मे रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नात डुमुनी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. दीपक पाटील यांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक तसेच नाट्यकला कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे. हा कार्यक्रम आविष्कारचे संस्थापक संजय पवार, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे न्युरोसर्जन डॉ. संतोष प्रभु, बँक ऑफ महाराष्ट्राच्या मुख्य प्रबंधक डूमुती मुर्म तसेच मागसवर्गिय आयोग भारत सरकार मा. सदस्या सुरेखा लांबतुरे, विभागीय आविष्कार फाउंडेशन अध्यक्ष संदेश नागे, अलिबाग तालुका शिक्षक भारती अध्यक्ष निलेश तुरे, दिलीप झावरे, ॲड. विजय पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रम प्रास्ताविक अविष्कार फाऊंडेशनचे संस्थापक संजय पवार यांनी केले.