मुलीने चालत्या गाडीवरून मारली उडी; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
| चणेरा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील चणेरा येथील एक शाळकरी मुलगी शाळेतून घरी जाण्यासाठी रोहा बस स्थानकात उभी होती. परंतु, अलिम आयुब कर्जीकर, (60) रा. मोर्बा आपली स्कुटी घेऊन मी सुद्धा चणेराला जात आहे असे सांगून मी तुम्हाला चणेराला सोडतो असे अलिम कर्जीकर याने सांगितले. परंतु, म्हाडा कॉलनी जवळ सीएनजी पेट्रोल पंपासमोर या मुलीला आरोपीने जबरदस्तीने चॉकलेट देण्याचा प्रयत्न केला असता त्याची संशयास्पद वागणूक मुलीच्या लक्षात आली. तिने तात्काळ गाडी थांबवण्यास सांगितले असता आरोपीने आणखी वेगाने गाडी मारण्यास सुरुवात केली. धाडसी मुलीने कसलाही विचार न करता आपला जीव धोक्यात टाकून धावत्या गाडीवरून उडी मारली व थेट रोहा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. तेथे आरोपीविरोधात या मुलीने तक्रार केली. त्यामुळे रोहा पोलिसांनी आरोपी अलीम आयुब कर्जीकर त्याच्या विरोधात रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक केली आहे.