| पनवेल | वार्ताहर |
कोणत्यातरी अज्ञात कारणाने इमारतीवरून उडी मारली असता, त्यात गंभीररित्या जखमी होऊन एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पळस्पे फाटा येथे घडली आहे. जितेंद्र साहू (23) असे या तरुणाचे नाव असून, त्याने अज्ञात कारणाने बिल्डींगवरुन उडी मारली. यात तो गंभीररित्या जखमी झाल्याने उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.