| पनवेल | वार्ताहर |
कळंबोली येथील लोखंड पोलाद बाजाराचा रस्ता ओलांडताना एक तरुण ट्रेलरच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाला. कळंबोली वसाहतीमध्ये सेक्टर- 13 येथे राहणारा मोहम्मद अमन करीम हा तरुण वाहन दुरुस्तीचे काम करत होता. मोहम्मद लोखंड पोलाद बाजारातील जे. के. मोटर्स या दुकानातून वाहनाचे सुटे भाग खरेदी करून प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरील रस्ता ओलांडत होता. त्याच वेळी तेथे आलेला मोठा ट्रेलर मोहम्मद याच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रेलर चालक तेथून पळून गेला होता. मात्र, काही वेळातच त्याला शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी 40 वर्षीय रमाकांत पाल या ट्रेलर चालकाला अटक केली. दरम्यान, या परिसरात पथदिवे नसल्याने हा अपघात झाल्याची माहिती येथील प्रवाशांनी दिली.