| पनवेल | वार्ताहर |
दोन मोटार सायकलमध्ये झालेल्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना पनवेल तालुक्यातील मोर्बे गाव येथील ऐश्वर्या रिसॉर्ट समोरील रस्त्यावर घडली आहे. बाळू गडगे (38) रा.मोर्बे हे त्यांच्या ताब्यातील मोटार सायकलवरुन मोर्बे गाव ते खैरवाडी असे जात असताना समीर भगत याने त्याच्या ताब्यातील मोटार सायकलवरुन भरधाव वेगाने येऊन बाळू गडगे यांच्या मोटार सायकलला पाठीमागून धडक देवून झालेल्या अपघातात बाळू गडगे हे जखमी झाले आहेत. याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.