। रसायनी । वार्ताहर ।
रसायनीतील बोरीवली येथे राहणारा रामप्रवेश बिरबल भुईंया (22) हा वाशिवली येथे डाॅक्टरकडे जातो असे सांगून निघून गेला. तो अद्याप न परतल्याने त्याचे वडील बिरबल जोगेश्वर भुईंया यांनी रसायनी पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. बेपत्ता रामप्रवेश हा रंगाने सावळा, उंची 5 फुट 2 इंच ,अंगात पिवळा शर्ट व राखाडी रंगाची साधी पॅन्ट, डाव्या हातावर ब्लेडचे कट मारलेले निशाण, पायात चप्पल, चेहरा गोल, हनुवटीजवळ काळा तिळ असे वर्णन असून या वर्णनाचा तरुण कुठेही आढळल्यास रसायनी पोलीस स्टेशन- 8430449695, पोलीस नाईक मंगेश लांगी -9158351095 यांच्याशी त्वरित संपर्क साधावा.







