। पुणे । वृत्तसंस्था ।
पुण्यातील मार्केटयार्डमध्ये डाळींब पॅकिंगच्या कामावर आलेल्या तरुणाला तुमच्यामुळे आमच्या मुलांना रोजगार मिळत नाही, असे म्हणून तलवारीने वार करुन जीवे मारण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी 6 जणांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पाच जणांना अटक केली आहे. अतुल शिंदे (27), तौसिक खान (27), जहीर शेख (28), विकास ढवळे (27), सायबा कोळी (26) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आतिश गुलाब शिरसाट (23) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मुंढे तपास करीत आहेत.
पुण्यामध्ये तरुणावर तलवारीने वार
