आर्थिक नैराश्यातून तरुणीची आत्महत्या

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

नवी मुंबईतील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीने घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 22 वर्षांच्या तरुणीने घरातच आयुष्य संपवलं आहे. तरुणीच्या आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईच्या ऐरोली सेक्टर 1 येथील ओंकार हाईट्स सोसायटीमध्ये पेईंग गेस्टमध्ये राहणाऱ्या नंदिनी नावाच्या 22 वर्षीय तरुणीने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. तरुणी विप्रो, आयटी पार्कमध्ये काम करत होती. तिच्यासोबत आणखी 3 मुली पेईंग गेस्टमध्ये सोबत होत्या. सुट्टी असल्याने इतर मुली आपापल्या घरी निघून गेल्या होत्या. त्यानंतर आज सकाळी दरवाजा उघडत नसल्याने 12 वाजताच्या सुमारास पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. नंदिनी ही मूळची कानपूरची होती. नंदिनी ही आर्थिक अडचणीमुळे नैराश्यात जीवन जगत होती. त्यातच घरात एकटी असलेल्या या तरुणीने टोकाचे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याबाबत रबाळे पोलिसांनी तपास केला. त्यांना तिच्या मृतदेहजवळ एक चिठ्ठी आढळून आली आहे. याबाबत रबाळे पोलिसांनी आकास्मित मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेनंतर तिच्या नातेवाईकांना कानपुरवरून बोलावण्यात आले आहे.

Exit mobile version