। रसायनी । प्रतिनिधी ।
मोहोपाडा येथून 18 वर्षीय तरूणी बेपत्ता झाल्याची घटना घडली असून, अन्नू शर्मा ही घरातून कुठेतरी निघून गेली असल्याची तक्रार मिथिलेश शर्मा यांनी दिली आहे.
रसायनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोपाडा येथील अन्नू राजेश शर्मा (18) ही राहत्या घराला कडी लावून सायंकाळच्या सुमारास कुठेतरी निघून गेली आहे. तिचा आजूबाजूच्या परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला असता तिचा काही ठावठिकाणा लागला नाही. तिचे वर्णन रंग गोरा, उंची 5 फूट, अंगाने सडपातळ, चेहरा उभट, केस काळे, अंगात नेसून लाल व काळ्या रंगाचा कुडता व काळ्या रंगाची सलवार, डोळ्यावर सोनेरी रंगाचा चष्मा असे वर्णन असून रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा म्हात्रे अधिक तपास करीत असून सदर बेपत्ता तरुणी कोणास आढळल्यास रसायनी पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.







