| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील तळोजा परिसरातून एक 19 वर्षीय तरुणी कोठेतरी निघून गेल्याने ती हरवल्याची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. रोहीणी अंकूश वाघमारे असे या तरुणीचे नाव आहे. तिचा रंग काळा, चेहरा गोल, ऊंची 165 सेमी, नाक सरळ, केस काळे आहेत. तिला हिंदी व मराठी बोलता येते. तसेच, तिने अंगात नारंगी रंगाचा टॉप व काळ्या रंगाची पँट घातलेली आहे. या तरुणीबाबत कोणाला काही माहिती असल्यास तळोजा पोलीस ठाणे किंवा पोलीस हवालदार बाळासाहेब काळेल यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तळोजा पोलीस ठाण्यातर्फे करण्यात आले आहे.
तळोजा परिसरातून तरुणी बेपत्ता
