तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स बनावट तर नाही ना!

अलीकडच्या काळात मोटार वाहन कायदा अधिक कडक करण्यात आला आहे. नवीन मोटार वाहन कायदा लागू झाल्यानंतर वाहतुकीचे नियम मोडल्यास मोठा दंड भरावा लागणार आहे. एखाद्या व्यक्तीने ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय वाहन चालवल्यास 5 हजार रुपये दंडासह 3 महिने तुरुंगवास भोगावा लागू शकतो. त्याचप्रमाणे बनावट ड्रायव्हिंग लायसन्स घेऊन वाहन चालविण्याचे कठोर नियम असून त्यात दंडासह शिक्षेची तरतूद आहे. तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सच्या वैधतेबद्दल तुम्हाला शंका असल्यास, तुम्ही येथे नमूद केलेल्या सोप्या स्टेप्सद्वारे ड्रायव्हिंग लायसन्स खरं आहे की बनावट हे जाणून घेऊ शकता.

ड्रायव्हिंग लायसन्स खरं आहे की बनावट असं तपासा-
1-सर्वप्रथम https://parivahan.gov.in/parivahan/या वेबसाइटवर लॉग इन करा.

2-येथे तुम्हाला Online Service वर क्लिक करा.

3-आता तुम्हाला Driving License Related Service चा पर्याय दिसेल.

4-तुम्ही या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर select state चा पर्याय दिसेल, जिथे तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे.

5-यानंतर तुमच्यासमोर एक वेगळी विंडो उघडेल जिथे तुम्हाला Driving licence चा पर्याय असेल, त्यावर क्लिक केल्यावर Service on DLचा पर्याय दिसेल, येथे तुम्हाला क्लिक करावे लागेल.

6-यानंतर, तुम्हाला Continue चा पर्याय दिसेल. तिथे क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक वेगळी विंडो उघडेल.

7-आता तुम्हाला तुमचा DL नंबर, जन्मतारीख आणि तुमचे राज्य पुन्हा सिलेक्ट करावे लागेल.

8-ही संपूर्ण प्रक्रिया केल्यानंतर, तुम्ही ओके करताच, तुमच्या DL चे तपशील समोर येतील. जर तुमच्या DL चे तपशील

Exit mobile version