आपला संकल्प विकसित भारत यात्रारथ

शासनाच्या विविध योजनांचाी दिली माहिती

| वाघ्रण | वार्ताहर |

अलिबाग तालुक्यातील वाघ्रण ग्रामपंचायतीच्या पटांगणात शुक्रवार, दि. 8 रोजी केंद्र शासनाच्या ‌‘आपला संकल्प विकसित भारत रथयात्रा’ दुपारी 2 वाजता दाखल झाली.

या रथयात्रा समितीचे स्वागत वाघ्रण ग्रा.पं. ग्रामसेविका सुवर्णा संजय पाटील यांनी केले. शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांना मिळावी आणि विकास व्हावा, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. समितीचे प्रमुख एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्प पेणचे क्रांतीकुमार जयराम पाटील यांचे शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन सरपंच राजेंद्र हरीश्चंद्र पाटील अभिनंदन व स्वागत केले.

यावेळी क्रांतीकुमार पाटील यांनी आदिवासी, आगरी, कोळी आणि इतर लाभार्थींना शासनाकडून मिळत असलेल्या लाभाची माहिती दिली. तर पं.स. विस्तार अधिकारी हेमलता सहदेव वाडेकर यांनी पंचायत समिती अंतर्गत योजनांचा आढावा घेतला. आरोग्य विषयावर मनिषा फड, समुदाय आरोग्य अधिकारी, गणेश गुरव आरोग्य सेवक यांनी तर सागर मित्र अपूर्वा पाटील, साहील पाटील यांनीदेखील योजनेच्या मार्फत येणाऱ्या लाभाबाबत माहिती दिली. केंद्र शासनामार्फत मिळणाऱ्या गॅस सिलिंडर, शेतकरी विमा, पाणीपुरवठा योजना आदींवर आधारित माहिती देण्यात आली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रतिनिधी अंजली म्हात्रे, राजश्री म्हात्रे, बदीनी पाटील, मनिषा पाटील आणि आशा कार्यकर्त्यांसह मुख्याध्यापिका संगिता म्हात्रे, शिक्षक निलेश वारगे, ग्रा.पं. सदस्या सोनाली पाटील, सुप्रिया पाटील, अक्षदा म्हात्रे, माजी सरपंच सुजाता पाटील यांच्यासह रथचालक प्रथमेश रेवडेकर, सिस्टीम ऑपरेटर शुभम खुराडे, पंकज म्हात्रे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला 47 महिला, 19 पुरुष वाघ्रण, खारपेढांबेमधून आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाघ्रण ग्रा.पं. माजी सदस्य दीपक यशवत पाटील यांनी केले.

Exit mobile version