| वाघ्रण | वार्ताहर |
सेवाश्रम सामाजिक विकास सेवा संस्था वाघ्रणच्या वतीने केंद्रस्तरीय वक्तृत्व स्पर्धा मंगळवार, दि. 1 ऑगस्ट रोजी पार पडल्या. लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेच्या पूजनाने स्पर्धेचे उद्घाटन झाले. या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून नेहरु युवा केंद्राचे रायगड जिल्हा कोऑर्डीनेटर निशांत रौतीले, वाघ्रण शाळा मुख्याध्यापिका संगिता म्हात्रे, भारतभूषण ॲड. जिवीता पाटील, वाघ्रण ग्रा.पं. प्रशासक सुवर्णा पाटील, विविध शाळांचे शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रारंभी सेवाश्रम संस्थेचे अध्यक्ष वाघ्रण ग्रा.पं. मा सदस्य पत्रकार दीपक यशवंत पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. निलेश वारगे यांनी स्पर्धकांना कोड क्रमांक देऊन शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सर्व मुलांना परीक्षक पद्माकर पाटील व जीविता पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेमध्ये एकूण 35 मुलांनी सहभाग घेतला होता. लोणघर, पेढांबे, वाघ्रण, चिंचवली, मांडवखार, नारंगी, बहिरिचा पाडा आणि मानकुळे या शाळांतील हे सर्व स्पर्धक होते. माझी शाळा, माझा गाव, माझी आई, आला पावसाळा, माझा छंद, मोबाईल हवा की नको, मी झाड बोलतो इत्यादी विषयांवर मराठी आणि इंग्रजी भाषेत मुलांनी भाषणे केली.
या स्पर्धेत इयत्ता दुसरी-तिसरीमध्ये कीर्ती प्रणय ठाकूर लोणघर प्रथम, अंश अजित पाटील द्वितीय पेढांबे, इयत्ता चौथी-पाचवीमध्ये प्रथम कार्तिक सुनिल पाटील मांडवरवार, द्वितीय शुभ्रा अजय पाटील पेढांबे तर इयत्ता सहावी-सातवीमध्ये फातीमा समशेद सय्यद प्रथम पेढांबे, निहार अमोल पाटील द्वितीय नारंगी आणि पर्णवी प्रयाग पाटील तृतीय क्रमांक पटकाविला. इग्रंजी माध्यमात प्रेम मंगेश पाटील वाघ्रण, प्रणव राकेश म्हात्रे बहिरिचा पाडा, अबीदा अशरफ सय्यद पेढांबी दुसऱ्या गटात, निदा महम्मद सय्यद पेढांबे तसेच फिजा कसीमुद्दीन शेख-नारंगी, ओमकार अजित हुमणे पेढांबे यांनी बाजी मारली. स्वरा रोशन पाटील प्रथम, तर आराध्या मनोज पाटील द्वितीय आल्या.
या सर्व विजेत्यांना सेवाश्रम संस्थेकडून शैक्षणिक साहित्य, शिक्षिका सुलभा ठोमरे यांच्याकडून पारितोषिके आणि नेहरू युवा केंद्राकडून प्रशस्तीपत्रके वाटप करण्यात आली. यावेळी दिपक पाटील यांनी या स्पर्धेसाठी कै. सितेज हेमंत पाटील यांच्या स्मरणार्थ विवेक केसरीनाथ पाटील-खारपेढांबे यांनी दिलेल्या बक्षिसांबद्दल आणि संस्था संचालक किशोर पाटील पेझारी व रविकीरण पाटील वाघ्रण यांनी केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद दिले, तसेच सर्व उपस्थित पालक आणि संस्था संचालकांचे आभार मानले. यामध्ये उदय पाटील, महेंद्र म्हात्रे, नेहा पाटील, राजेंद्र पाटील, उदय शेरमकर, ॲड. प्रणाली पाटील आदींचा समावेश होता.