। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल जेएनपीटी मार्गावर पुष्पकनगर बायपास रोडवर पिस्तुल व जिवंत काडतुसे जवळ बाळगणाऱ्या तरुणाला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. आकाश खंडागळे (21) असे या तरुणाचे नाव आहे.
पनवेल जेएनपीटी बायपास रोडवरील बिंदू ढाब्याजवळ एक व्यक्ती शस्त्र घेऊन येणार असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला होता. याचवेळी खंडागळे तिथे आला. पोलिसांनी त्याला थांबवून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पिस्तुल तसेच जिवंत काडतुसे आढळून आली. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याकडील पिस्तुल जप्त केले आहे.
पिस्तुल, जिवंत काडतुसे जवळ बाळगणाऱ्या तरुणाला अटक
