। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून एक तरूण बाहेर राज्यात पसार झालेल्याची घटना घडली होती. या संदर्भात मुलीच्या पालकांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या आरोपीला पनवेल तालुका पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा पाठलाग करून त्याला पीडित मुलीसह ताब्यात घेतले आहे.
पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पालीस उपनिरीक्षक दीपक शेळके, पोलीस हवालदार महेश धुमाळ, सतीश तांडेल आदींच्या पथकाने तांत्रिक तपासाद्वारे या आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान, आरोपी हा वेळोवेळी मोबाईल नंबर बदलत होता, त्याचप्रमाणे राहण्याची ठिकाणे सुद्धा बदलत होता. तरी या पथकाने त्याचा कर्नाटकातील जी यादगीर, तेलंगणातील सिकंदराबाद व आंध्रपदेशातील तिरुपती राज्य याठिकाणी त्याचा पाठलाग केला. अखेर त्या आरोपीला सिकंदराबाद रेल्वे स्टेशन येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याच्यासह पीडित मुलीला ताब्यात घेण्यात आले. संजय राठोड (22) असे आरोपीचे नाव असून त्याला पनवेल तालुका पोलीस ठाण्यात हजर केले असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याचबरोबर पीडितेसोबत आरोपीने शारीरिक संबंध ठेवल्याने त्याला अटक करून 5 दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणार्या तरुणाला अटक
