। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील वांगणी येथील स्वप्नालय मुलीचे बालगृह येथून एक अल्पवयीन तरुणीचे अपहरण करण्यात आले आहे. स्वप्नालय मुलीचे बालगृह येथून मुस्कान अरबाज शेख (16) हिचे अपहरण करण्यात आले असून, तिची उंची 4 फुट 6 इंच, रंग निमगोरा, नाक लांब व सरळ, केस काळे, बांधा मजबुत असून अंगात पांढऱ्या रंगाचा टिशर्ट त्यावर काळ्या रंगाचे पट्टे, उजव्या हातावर कोपरा जवळ लहान पणी लागल्याची खुण आहे. तिला हिंदी, मराठी भाषा अवगत आहे. याबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे किंवा सहा पोलीस निरीक्षक सुनील वाघ यांच्याशी संपर्क साधावा.







